*डबल गेम*
******************
*रोशनकुमार शामजी पिलेवान चंद्रपूर*
****************
समीर बसची वाट पाहून प्रचंड कंटाळला.एखादा आटोरिक्शा किंवा चुकून उशिर झालेला एखादा बाईकस्वार तरी मिळेल या आशेने तो तग धरून होता.सहा...साडेसहा...सात वाजायला आले घड्याळात.बापरे !चक्क तासभर झाला बसची वाट पाहून .तो यायच्या आधीच बस निघून गेल्याचं कळलं .शेजारी बसलेल्या माणसाकडून.
"तुमी कोठी चाल्ल्यातं ?"तो इसम चौकशी करू लागला .
"शंकरपूरालं"
"मीही तेतीच चाल्लू जी!" समीरला जरा हायसे वाटले.आपल्याला एक सोबती भेटल्याचे समाधान चेह-यावर झडकायला लागले.
"बसं भेटणार नाही का जी." समीरने पुन्हा समाधानासाठी विचारलं.
"आता भेट्टे का जी .कैनाडावची गेली ते! पौचली असल आतारवरी .साहा वाज्ताच भग्यान करते .हाल्टींग रायतेना तेतीच." त्यानं पुस्टी जोडली.
"मंग आता कसा जावाचा तं?"समीर चेह-यावर चिंतेची छटा आणत विचारायला लागला.
"जाता येईल कसातरी.नायतं येतीच मुक्काम करावाचा माज्ज्या बल्यासिन."त्यानं डाव्या तळहातावर उजव्या हाताची मुठ घसरवत म्हटलं.
"पण मालं अजच जावा लागते ना ."समीर तळमत सांगायला लागला.
"मंग का पैदल जाहाल."तो हासतच बोलला.
"मी गाडी बोलावलू गावात्ना."
"कोण येणार आहे तं?"
"रामहरी चौधु-याचा!"
"अरे मंग जम्ला.भाशाच हो आपला .तो नेईल मालं.त्यायच्या घरी चाल्ल्या का तुमी?"
"त्यायच्या घरी ..:-..मंजे गावात नाटक आहे."
"अस्सा ,मंजे नाटक पावालं चाल्ल्या ?"
"नाही जी नाटकात काम करालं.!"'समीर..
"तुम्ही नाटकात काम करता ?."त्यानं उत्सुकतेनं विचारलं.
"कवातरी करतो..भेटला चान्स तं
तुम्ही कोणाच्या घरी चाल्ल्या ..?"
"सखाराम रावताच्या...नाटक पावालच चाल्लू ...बलावला होती."
" येवळा उशिर काऊन लावल्या तं ?"
"शेवटची गाडी आहे.सहाची माहीत होता.पण ,.वेळच झाला."
"मालई उशिरच झाला.शाळा करून निंगलो सकाळची .ट्रेनना येवालं उशीरच लागला.त्यात अज उसराच आली ट्रेन."
"तुमी कोणत्या गावचं होवा?"त्याने समीरला विचारलं,
"मी वडसाचा हो.तिकळं डिवटी आहे मास्तरची.गडचांदूरकळ."
"बापरे.बुहू लंबं रायत्या,कंपनीच्या नाटकात काम करत्या का?"
"नाही,असाच आपला ,भेटला मोका मारला चौका.मित्र होते.तो ,,,म्हणे नाटकात काम करशील का? मी हो मंलू.संधी काहालं सोडावाचा ."
"बराबर आहे,तसं तुमचं मास्तराच जास्त नाटका करतेत."तो हसला मीही हसलो.
"तुमी कोठं रायता तं.का संकरपुरचेच."
"मी जेलमधून आलो." मी काहीच न ऐकल्यासारखं केलं.त्याला पुन्हा विचारलं.
"कोठनाल आलू मनल्या?"
"जेलमधून ..."
"नाईजी मज्याक करत असाल."
"मी कायलं मजाक करू.जेलमधीच रायतो मी.नागपुरच्या ."त्याने बिनदिक्कत सांगीतले.समीरनं सावरलंच स्वतःला.तो थोडा घाबरलाच.निःशब्द झाला.काय बोलावं ते कळतच नव्हतं त्याला.आपल्याला नाटकाला जायचं आहे.हे ही विसरून गेला तो.क्षणभर भयान शांतता पसरावी तशी.... दोघांत काहीच संवाद झाला नाही.
न राहून समिरने विचारलच .
."काऊन ? कोणत्या संदर्भात गेल्या तं जेलमंदी?"त्याची उत्सुकता शिगेला पोहचली होती.
"बायकोचा खून ..:बायकोचा खून केला होता मी "
"कुणाच्या ,.."झटक्यात विचारलं समीरनं .
"कुणाच्या म्हंजे ....माझ्याच बायकोचा खून .....मीच केला ."
समीरच्या पायाखालची जमिन निसटते कि काय असाच भास झाला.एका अट्टल गुन्हेगारासमोर आपण ऊभे आहोत .याची जाणिव झाली त्याला.नाटकात अनेकदा त्याने खूनी ,बलात्कारी पात्र पाहिली होती.पण प्रत्यक्षात ही पहिलीच वेळ.
हा माणूस आपल्या बायकोचा खून करायला घाबरत नाही.इथे या अवेळी आपल्यांशी काही दगा फटका केला तर....! निदान आपल्याकडील पैसाआडका हिसकावून घेतला तर....!मनात संशयाची वीज चमकून गेली.
तो मनात त्याच्या पासून सावध झाला.
क्षणभर काहीच बोल्ला नाही.पण हा या तालुक्याच्या चौकात आपल्याला काय करणार?रहदारी तर चालूच आहे.फक्त आपल्या मार्गावरील गाड्या तेवढ्या बंद आहेत.त्यात आपण काय वाकडं केलय त्याचं.म्हणून पुन्हा तो उत्सुकतेनं विचारायला लागला.चौकातला पानठेला चालूच आहे.
"का झाल्ता . एवढा मोठ्ठा पाऊल उचलावालं ?"
"का सांगाल ...नशिबाचा फेरा...भोगल्याशिवाय चुकते काजी?"
"हो मना .ते पण बरोबरच आहे.पण का झाल्ता तं.तुमी डायरेक जेलमधून आलो मन्ल्याना विचारतो बावा .नाही तं तुमालं वाटल नस्त्या चंभार चौकशा करते मनून ."समीरनं आपली भूमिका मांडली.
"ते फसली होती दुसऱ्या संगा ?"
" बापरे! भारीच केस !!!"
"भारी नाही...लय भारी केस मना.दारी आयकतच नोयती .सांगून सांगून इटला जीव.एकरोज रंगेहात भेटली .दारीचा पिंडाच लचकवलू मंता का नाही कुराळीना .त्याचाही पाय तोल्लू.पर पराला मादरचोर....! नाईतं त्याचाही एक घाव दोन तुकळच करणार होतू."
सांगतांना त्याच्या तोंडातून आग बाहेर पडावी असाच भास होत होता.नाक फुरफुरत होतं.डोळे खूनशी झाले होते.
"कोणत्या गावचे होवातं तुमी ?"
"लखांदूरचा !!!"
"अना तो कोणत्या गावचा हो?"
"अर्जुनीचा "
"तो कायलं आला तेती ?"
"ठेकेदार होता विटाचा . माजी बायको विटा टाकालं जावाची त्याच्या भट्टीवर.तेती जमला असल त्यायचा जुगाळ . मालं जरजरा कुनकुन लागली गावातनाल.पर डायरेक कसा मनाल कोणालं .बायको झाली तं का तिलं विचाराल .तुझा ठेकेदाराशीन आहे का मनून!"
"मंग कसा पत्ता लागला तं?"
"आमच्या बाजूच्या घरवाल्याना सांगलन .तो ठेकेदार तुमच्या घरी दुपारी रोज येते मनून .
मी मंलू एकांदा काम असल तं आला असल."
तो सांगत असतांना रामहरी चा फोन आला.."हा...भेटला का ..काही गाडी ..गुडी.?"
"अरे नाही ना.ये लवकर .नाहीतं माजा नाटक येतीच होयेल फाट्यावर.."
"सोबत लखांदूरचा सदाशीव मामा आहे मनून सांगा."त्या इसमानं सुचना केली.
"अरे .तुझा सदाशीव मामा पण आहे येती फाट्यावर.."
"माज्या कळ द्या मी बोल्तो ."सदाशीव मामानं जवळजवळ मोबाईल हिसकावूनच घेतला समीरकडून.
"हा भाशा...मी आहो येती या गुर्जी संगा वाट पायेत.लवकर पाठवून दे गाडी."
"......."
"हो हो ...मंगाशीच आलू .का करशील गाडी निसटली तं.बसलू वाट पायेत .तं हे गुर्जी भेटलं.यायच्याशी बोलत बस्लू.का करशील.याटो नाई नं फाटो नाई.बहीनमां सप्पा बेंगा पल्ला.पाठव लवकर गाडी."
"........"
"हो....हो....!!पाठव...,हो...हल्लो...हल्लो.!!!"
"ठेवलन वाट्टे...."
"आत्ता काही धोका नसं.पाठवतो मंलन गाडी."
"हो ...येतो मंलन.अर्ध्याक तासात."
"........"
"तं अस्सा नाटक झाला नाही तुमचा."
"कातजी ..नाटक नाही तं.मी मिस्तरीच्या कामावर जा.ते विटा टाकालं जा.पोरा शाळेत जात."
"पोराही आहेत का ?" समीरने अधीरतेनं विचारलं.
"कातजी .दोन पोरा आहेत.एक चौथीत, एक दुसारीत..दोघही पोराच."
"पोरा बाराच्या मायाही अशा करतेत काजी?"
"पोराच्या माया ना बुळग्या बाळग्याही.साली बायकाची जातच हरामी.एकांद्याना चिकण्या चोपळ्या गोस्टी केलन का फस्कन फुसालतेत.आपल्या कुकवाना मेल्याशिवाय बायको आपली नाही मनाची.तुमचा लगन झाला का नाही?"त्या गमतीन विचारलन.
"नाही झाला जी.अंदा कराचा विचार आहे,"
"साजरी पाऊन करा .नाहीतं बायकाचा काई खरा नोहे."
"का चांगला पाहाल.पयला साजरी रायली का तुमची बायको.?"
"साजरीच होती जी.दोन पोरा झालं.काहालं तिलं दोस देवाचा.पर त्या भळव्या ठेकेदाराना बिघळवलन तिलं.हिरवी नोट दावल्यावर हिलंही गोड वाटत होता ना त्याचा '......'! साली फसली! मालं एकवेळ दिसली त्याच्या गाडीवर फिरतांनी .मी हटकलू.तं मालच तीन तेरा ना नव अठरा सांगावालं लागली.का झाला मनं त्याच्या गाडीवर आलू तं.तुमी नाही आना का मनं कोणालं सायकलवर बसवून.झगडा करं माज्या संगा."
.......
"पटवालं गेलू तं आमी नाई पटवू सकत का बाया.ईटा जोळतांनी मसाला आंगावर जाणूनबुजून टाकला तं दोन दिसात गेरमंदी येते बाई.पर आमालं विचार येते बायका पोरायचा .पर ह्या बायका कवा बदलतील काई नेम नसं."
"कातंजी साल्या बायका हरामीच रायतेत.आमच्या एका मास्तराची बायको अशीच फसली आहे घरमालकाच्या पोरासोबत.मास्तर शाळेत गेला का ते मजा मारते दिवसभर.मी पायलो मनून सांगतो रे बाव्वा."समीरने त्याच्या अनुभवातील घटना विषद केली.
"अशा बायकायलं उभ्याना ठेसला तरी काही बिघळं नाही." त्याच्या अंगाचा तिळपापळ होत होता.
"माणसाही तसच रायतेत नाही का जी.चांगला घर दार बायका लेक्रा राऊन सुद्धा बाहेर हाव टाकतेत.रोज रोज वांगा भात कोण खाईल मनून."
"मी चांगलाच रायेत होतू नाजी.तिलं कवळीचा तरास नोहोता.तेई कामालं जा .मीही जा.हप्त्यालं खाऊन पेऊन उरनी पळत पैसं.दोघाच्या कमाईचं.पण तिची बुद शेण खावालं गेली तं का कराल.बुहू समजवलू जी तिलं.आपलं सोन्यासारखं पोरा आहेत मंलू.आपण दुसऱ्या गावालं काम करालं जाऊ मंलू.पर त्याचा नाद सोळालच तयार नोहोती.एक वेळा रंगेहात पकळलू.त्यालं दोन चार माणसा जमवून मारलू.पण हे मालंच मारालं धावं.एक वेळ जहर टाकलन काजी जेवनात.का करता मोठ्ठा जीवालं फासा.दोन पोरा ना मीही .दवाखान्यात लवकर नेला सेजा-यायना मनून बरी वागली .नाहीतं तीघई बापलेकाचा राम नाम सत्य झाला असता.आता लोकायलं हीचा ना त्याचा लफळा माईत झाला तं भेवतही नोयती कोणालं."
"एवढी अफांड झाल्ती का जी ."
"कातजी. पेम मोठा डगर रायते .धुंद्रीच चहडते .तिच्या मायबापालं सांगलू .तं त्यायलं सास नोयती लागत.ईना उल्टा बार भरलन त्यायलं.माझ्यावर संसेय घेते .मालं ईसारा लावते मनून.दारू पेऊन मारते .काईच्या बाई .एकाचा दोन ना पायलीचा तीन सांगालं लागली."
"तुमी दारू पेता काजी?"न राहून समीरनं शंका विचारली.
"आयुष्यात थेंब नाही पेलूजी दारूचा.साधा खर्रा नाही खा.हं तमाकू खात होतो फक्त.तोही सोडलू जहलात गेल्यावर."
"काऊन जी तेती नाही खाऊ देत का ?"
"तेती सगळाच भेट्टे सवक करतो मन्ला तं .पण माझी आदत सुटली.मंग खाऊसा नोहोता लागत."
"मंग तुमची बायको खोटा सांगत होती ?"
"कातंजी ...त्यायना मालं मारालं गुंडे लावला होती."
"बापरे गा ,एवढे भयानक .ते ही आपल्याच पोरीलं खरा ठरवतील ना.?"
"हो पण परस्तीती का आहे याची तं शाहानिशा करावा ना.मी एक दोघायलं तं ससला उचलून आदळतो जी.असा बदळवलू त्या गुंड्यायलं आडवं झालं तवा.गांडीलं पाय लावत परालं भडवं."
त्याचे बाहू स्फुरत होते हे सगळं कथन करतांना.समीर मात्र एकाग्र चित्तानं हे सारं ऐकत होता.मध्येच एखादा प्रश्न विचारून त्याला बोलतं करत होता.
"मंग का झाला तं ? "
समीर..
"एक दिवस सांगलू हिलं अज बयनीच्या गावी चाल्लो रात्री येत नाई मनून.मी तयारीनाच गेलो.पोरायलं बयनीच्या घरी घेऊन गेलो.मनात ठरवून टाकलू का आज जर भेटला तं याचा गेम करावाचाच.दिवसभर हे काई घरी आलं नाई.अज मी नाही आहो यायलं माहित होता ."
"मंग?" समीर ..
"मंग का मंग?...धनी गेला जागली ना बरी संधी सादली.यायलं वाटला आता रात आपलीच आहे.रात्री बाराक वाजता मी गावात आलू.कुळालं कान लावून पायलो तं यायची खुसूरपुसूर आयकू आली.मी कुराळच पाजवून आणलो होतो.दरवाजा ढकलून पायतो तं लावला होता अंद्रून.मारलो लाथ ना काहाळलो कळी... तं यायची पंढरी दांदरली . दोघही नांगवच होतं .परालं नाई सुदरला .त्याना परावाचा रस्ता धरलन .तं पोटरीवर मारलो कुराळ दोनही हातायना .अशी झिल्पी फोडल्यावानी फोडलो मंता का नाही.मेलो रे बाप मनून बसला तो हरामी .ईना माज्या हातातली कुराळ हिस्कवालं आली तं तो पराला .मनून वाचला .नाईतं पयलं त्यालं ऊभा चिरत होतो.हिना हिसकावालं आली तं मारलू हिलं हुदाळा ना पाळलू. ऊतानीच्या वातानी पळली.तीलं नांगवी पाऊन मालं अजून चीड आली .ना झाडाच्या फल्क्या ऊडवल्यावानी तिच्या फल्क्या उडवलू.जाग्यात थंडी पळली.तस्साच गेलू धावत धावत पोलीस ठेसनात .रक्ताभरली कुराळ घेऊन.
त्या पोलीसालई घाम फुटला माजा अवतार पाहून.त्याना अजून दोन चार पोलीसायलं उठवलन .त्यायना मालं अंदर टाकला. मंग सजा झाली जन्मठेप.दाहा वर्साची."दोन वर्सा रायलं भोगावचं.आता पेरोलवर सुटून आलू,सुट्या रायतेत सरकारकडून."
भुमितील लाव्हा बाहेर यावा आणि आग शांत व्हावी तसा तो शांत झाला होता.
"तुमालं वाईट नाई वाटत का आता.त्या गोष्टीचं .आपल्या हातून एवढी मोठ्ठी चुक झाली असं नाही का वाटत?पश्चाताप वगैरे ,.....?" समीरने जरा शांत डोक्याने विचारले.
"नाही.काहाचा पश्चाताप ....? सांगून आयकत नसेल तं का कराचा.त्यालं नवरा तरी करून टाक मंलू. तं तशीही नोयती आयकत .माझ्यासोबत राहून डबल गेम खेळत होती."
"बरं त्याचा लगन नोहोता का झाला.?"
"झाला होता ना .त्यालही दोन लेकरा होतं मादरचोदालं .पण पैशाची मस्ती.पैशाना गरीबायच्या माया ,बयनी ,बायका ईकत भेटतेत असाच वाटते ना सिरिमंतायलं. तो माज्या हातून निसटला याचा वाईट वाटते जी गुर्जी ."
"आता असल ना तो ठेकेदार ."
"मेला तो.साला जयेर पेऊन मेला मनं.त्याची हजू झाली गावभर .त्याच्या बायकोलं माहित झाला.आता पोलीसा पकळतील मंलन ना तिसऱ्या दिवसी एन्ड्रेल पेऊन मेला काना.नाही तं त्यालं सोडत नोयतो जी.कोठीही भेटला अस्ता तरी त्याची मस्ती जिरवत होतो."त्याच्या डोळ्यातून आजही अंगार ओकतांना बघून समीर शहारलाच.त्याच्या अंगावर काटे उभे झाले.
"बापरे!भयानकच आहे तुमची काहानी."
"का करता जी .पण माझं घर बरबाद झालं."तो अंतरी पश्चात्तापदग्ध झाला होता.
"आता मुलं कुठं आहेत तुमचे?"
"बयनीना चंद्रपूराच्या होस्टेलात ठेवलन .शिकत आहेत बिचारे: "त्यानं सुटकेचा निःश्वास सोडला.
समीर शांतच होता.घडलेल्या समग्र घटनेच्या संदर्भात गुंतत होता तो.विचार करत होता .कसं घडलं.का घडलं.इतकं भयानक कसं असू शकतं जग? पैशांनी बायका भुलवणारा ठेकेदार ...पैशावर भाळून शरीर सुखाची चटक लागून निर्ढावलेली वासनांध बायको....बायकोचा निर्घृणपणे खून करणारा निर्दयी नवरा ही पात्र एखाद्या सस्पेन्स नाटकातील प्रवेशांप्रमाणे त्याच्या अंतरंगात खळबळ माजवत होत्या."जग इतकं भयानक आहे .नाही.?"तो स्वतःशीच म्हणाला खरा पण सदाशीव मामानं ऐकलच.
"आपण सोचतो त्याहून भयानक आहे गुर्जी !!!"
"खरच!!"
"पण भाशा कसा नाही आला अजून .?का येतीच होईल तुमचा नाटक.?"दोघेही खळाळून हसले.रात्रीच्या अंधारात त्यांचं हसणं भेदक वाटत होतं.
"येईल मना आता.ये तो मंलन तं."
"तेवढ्यात दोन गाड्याचे प्रकाशदीप अंधार भेदत आले.लख्ख पडलेल्या प्रकाशाने समीर आणि सदाशीव मामाचे डोळे दिपलेच.गाड्यांचे लाईट बंद झालेत.
"गुर्जी ,कोठी आहा?"
"कोण रामहरी हो का?"समीर आवाजाच्या दिशेनं जात होते.आता अंधार असल्याने दिसत नव्हते.बसस्टापवर अंधूकसा पथदिवा तेवढा उजेड पेरत होता.
"हो.चला लवकर."
"अरे किती वेळ लावल्या येवालं?झाली का तयारी.नट्यागीट्या आल्या का?"
"बाप्पा कातं,त्या उजेळीवाजेळीच आल्या,तबलावाला पेटकर गाणं बसवत आहेत.तुमचीच वाट होती.मन्ला येत्या का नाही?"तो मजाकीने म्हणाला.
"बाप्पा येशील नाही तं का करशील.तुलं शब्द देला होता.फर्दी पाठ झाली.गाडी उसरा आली तं बोचा झाला."
"चला बसा.मामाजी रामराम"
"रामराम....नाटक पावालं आल्या का ?"
"होना बावाजी.बोलावल्या तं आलू."
"कदी आल्यातं तिकळून ?"
"दोन दिवस झाले .पोरायलं भेटून आलू परवाच्या दिसी ,आता हिंडतो ईकडे तिकडे ....जीवगमवालं.मंग तंआहेच आपला जेलची हवा.....चून भात खावा...!!"मामाच्या बोलण्यावर सगळे हसले.
"चला बसा त्या गाडीवर एकजण या गाडीवर एक..."
मामा रामहरीच्या सोबत्याच्या गाडीवर बसला ,समीर रामहरीसोबत.गाडीची किक सुरू झाली.आणि ते शंकरपूरच्या दिशेने निघाले .समीरच्या डोक्यातून मामाच्या आपबीती घटनेचे संदर्भ काही केल्या जात नव्हते.जग ही रंगभूमी आहे आणि आपण त्यातील कलाकार हे प्रसिद्ध वाक्य आठवू लागला.त्यात तो मामाचे अस्तीत्व शोधू लागला.हा नेमका नायक आहे कि खलनायक ,हा गुंता त्याला सोडवता येत नव्हता.डोक्यात विचारचक्र प्रचंड वेगाने फिरत होतं नि रस्त्यावर ह्या दोन गाड्या अंधार चिरत ,धूर उडवत चाल्ल्या होत्या.
*****************
रोशनकुमार शामजी पिलेवान
मु.पो.पिंपळगाव भोसले ता.ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर 441206
मो.नं.7798509816

Thanks sir reading
ReplyDelete